ब्रेकिंग! सोलापुरात सुप्रिया सुळे यांच्या सभेला रेकॉर्ड ब्रेक गर्दी
सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार महेश कोठे यांच्या प्रचाराची सांगता सभा आज भाजपचा बालेकिल्ला असलेल्या बाळीवेस येथील विजय चौकात पार पडली. यावेळी भर उन्हात देखील सभेला नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
व्यासपीठावर सुधीर खरटमल, महेश गादेकर, मनोहर सपाटे, नाना काळे, भाजपचे माजी नगरसेवक सुरेश पाटील, नागेश वल्याळ, महादेव चाकोते, उदयशंकर चाकोते, बिज्जू प्रधाने, प्रथमेश कोठे, अक्षय वाकसे, सुनीता रोटे, प्रतीक्षा चव्हाण, यांच्यासह महाविकास आघाडीतील प्रमुख नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते
यावेळी सुरेश पाटील यांनी आपल्यावर कसा अन्याय झाला याचा पाढाच वाचून दाखविला, तसेच शहर उत्तर च्या आमदारांनी हिंदू मुस्लिम सह लिंगायत समाजातील एक तरी युवकाला नोकरी लावली का, असा सवाल उपस्थित केला.
तर आता पराभव दिसू लागल्याने अन्य प्रकारे मतदारांना आकर्षित करण्याचे काम विरोधकांनी सुरू केले असून घरकुल मधील जनता हुशार आहे, तुमच्या भूलथापांना आणि आमिषाना बळी पडणार नाही, असे म्हणत महेश कोठे यांनी विरोधकांवर तोफ डागली.
निवडणूक सोपी नाही पण आपला गडी पण भारी आहे असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी महेश कोठेना कौतुकाची थाप दिली. आता काही विरोधक आमिष दाखवतील, चहा देतील, एक नाही दोन्ही हातानी घ्या, ते पन्नास खोक्याचे सरकार आहे, ते काही स्वतःकडच देत नाहीत. आपले घेऊन परत आपल्याला देत आहेत, त्यामुळे सर्वांनी महेश कोठे यांना निवडून ध्या म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी रामकृष्ण हरी वाजवा तुतारीचा नारा दिला.