सोलापूर
नाद करा पण आमचा कुठं?
- सोलापूर शहर उत्तर मतदार संघातील महायुतीचे उमेदवार आ.विजयकुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ धर्मशी लाईन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने काॅर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते . महायुतीतील घटक पक्ष असलेलया राष्ट्रवादीच्या सर्वच प्रमुख पदाधिकारी नेत्यांनी चांगलीच कंबर कसली असून शहर उत्तर मधून यंदा ही सलग पाचव्यांदा विजय मालकांना सर्वाधिक लीड मिळवून विधानभवनात पाठवण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वच नेते मंडळी, जेष्ठ नेते, सर्वच फ्रंटल सेलचे अध्यक्ष कार्याध्यक्ष अथक परिश्रम घेत असून मालकांनी शहर उत्तरचा विविध विकास कामांमधून कायापालट केला असल्याने मतदार राजांचा प्रचंड असा प्रतिसाद मिळतोय. त्याच अनुषंगाने धर्मशी लाईन येथे राष्ट्रवादीच्यावतीने या सभेचे आयोजन केले गेले होते .व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार, प्रदेश उपाध्यक्ष आनंददादा चंदनशिवे, डाॅ. किरण देशमुख उपस्थित होते.
- जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार व माजी नगरसेवक डॉ. किरण देशमुख यांनी त्यांच्या मनोगतात आमदार विजयकुमार देशमुखांनी चार वर्षात शहर उत्तरचा कायापालट केला आहे. विकासरत्न आमदार अशी आ. देशमुखांची सर्वपरिचित ओळख आहे .केवळ निवडणुकांपुरता जनसपंर्क नाहीतर मालकांकडे कोणीही जाऊदे मालक आपुलकीने आलेल्या व्यक्तीशी बोलतात त्यांच्या समस्या ऐकून घेतात. प्रश्न मार्गी लावतात. प्रत्येकाच्या सुख दुःखात प्राधान्याने सहभागी होतात. महायुती सरकारने राज्यात सर्वागीण विकास साधलेला आहे .राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, देवेंद्र फडणवीस यांनी विविध योजनांच्या माध्यमातून उपेक्षित वर्गाला न्याय मिळवून दिला शैक्षिणक, सहकार , औद्योगिक , क्षेत्रात विकासाचे परिवर्तन केले आहे आणि येणाऱ्या काळातही यापॆक्षा आणखी चांगल्या पद्धतीने राज्याचा नक्कीच विकास होईल यात शंका नाही. मालकांनी सोलापूराला जोडणारे सर्व रस्ते सहा पदरी केले स्मार्ट सिटी योजनेतुन सोलापूरचा चेहरा बदलला. दुहेरी पाईपलाईन 200 बेडचे हाॅस्पिटल कामगारांसाठी दहीटणे येथे घरकुल बांधले. छत्रपती संभाजी महाराज चौक सुशोभिकरण, छत्रपती शिवाजी महाराज चौक सुशोभीकरण, विविध समाज मंदिरांसाठी दिलेला भरमसाठ विकास निधी हे मतदार राजाला माहिती आहेच आणि मालकांच्या नावातच ‘विजय”असल्याने यंदाही मालक प्रचंड मताधिक्याने विजयी होतील.