राजकीय

ब्रेकिंग! मतदानाच्या दोन दिवसआधी भाजपचा मोठा डाव

  1. राज्यात विधानसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा सुरु आहे. विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे दोन दिवस शिल्लक असताना भाजपने ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे.
  2. ठाकरे गटाला वाशिममध्ये मोठा धक्का बसला आहे. वाशिम विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे पदाधिकारी असलेले राजाभैय्या पवार आणि युवासेनेचे जिल्हा सचिव गजानन ठेंगडे यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यातील पवार यांनी आधीच बंडखोरी केली होती, ते वाशिम विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवत आहेत. मात्र त्यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
  3. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या दोन्ही नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. हा ऐन विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटालासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

Related Articles

Back to top button