राजकीय
पत्नीची पतीला धमकी, राष्ट्रवादीला मत द्या. नाही तर आज रात्री…
- विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी महायुती, मविआ, मनसेने जाहिरातींवर भर दिला आहे. निवडणुक प्रचाराच्या तोफा उद्या थंडावणार आहेत. अशातच, अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीकडून नवीन टीव्ही जाहीरात काढण्यात आली होती.
- मात्र, निवडणूक आयोगाने जाहिरातीवर आक्षेप घेतला आहे व काही ठराविक भाग काढण्याचे आदेश दिले आहेत.
- अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या टीव्ही जाहीरातीत एक पत्नी आपल्या पतीला राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीच्या योजनांची माहिती देते आणि शेवटी आता तुम्हीही राष्ट्रवादीला मत द्या. नाही तर, आज रात्री मी तुम्हाला जेवायला देणार नाही, असे विनोदाने म्हणते. याच दृष्यावर निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला आहे. एखाद्या विशिष्ट पक्षाला मतदान न केल्यामुळे कुणीही कुणाला अन्न नाकारू शकत नाही, असे निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे.