क्राईम

नवनीत राणांच्या सभेत मोठा राडा

  1. राज्यात विधानसभा निवडणुकीत प्रचाराचा धुराळा उडाला आहे. आज रविवारी अनेक नेते आणि स्टार प्रचारकांच्या सभा होणार आहेत. दरम्यान अमरावतीच्या दर्यापूर विधानसभा मतदारसंघामधील खल्लार गावात माजी खासदार नवनीत राणा यांच्या प्रचार सभेत मोठा राडा झाला. या राड्या दरम्यान नवनीत यांच्या अंगावर खुर्च्या फेकण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला. या घटनेत नवनीत थोडक्यात बचावल्या आहेत. या सगळ्या घटनेनंतर खल्लार पोलीस स्टेशनमध्ये नवनीत यांनी केली तक्रार दाखल केली आहे.
  2. युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार रमेश बुंदीले यांच्या प्रचारार्थ नवनीत राणा खल्लारमध्ये होत्या. त्यावेळी ही घटना घडलेली आहे. नवनीत राणा दर्यापूर मतदारसंघामध्ये शनिवारी प्रचारासाठी होत्या. बुंदीले यांच्या प्रचारार्थ खल्लारमध्ये मोठ्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. परंतु सभेत मोठा गोंधळ झाला. सभेदरम्यान दोन गटाचे कार्यकर्ते आक्रमक होत भिडले. हे प्रकरण पोलिसांनी तातडीने शांत केले.
  3. परंतु या घटनेमध्ये अनेकजण जखमी झाले. सभेदरम्यान आक्रमक जमावाने एकमेकांना खुर्च्या फेकून मारल्या. घटनास्थळी तोडफोडदेखील करण्यात आली. दोन्ही गटात जोरदार हाणामारी अन् हाणामारी झाली. सध्या खल्लार गावामध्ये तणावपूर्ण शांततेचे वातावरण आहे. घडलेल्या प्रकारानंतर नवनीत यांनी पोलिसांत धाव घेतली.

Related Articles

Back to top button