राजकीय

शिवसेनेच्या फुटीमागे रश्मी ठाकरेंचा हात?

  • महाविकास आघाडी तयार होऊन उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री झाले, तर आदित्य ठाकरे यांच्या गळ्यात कॅबिनेटची माळ पडली होती. राज्यातील सर्वात तरुण मंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली होती. त्यावेळी त्याची खूप चर्चाही झाली होती. राजकीय वारसा लाभल्याने त्यांच्या गळ्यात मंत्रि‍पदाची माळ पडल्याचा दावा होता. आता एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराने आदित्य यांना मंत्रीपद द्यायला नको होते, असे म्हटले आहे.
  • आदित्य यांना राजकारणाचे बाळकडू लहानपणापासूनच मिळाले आहे. मातोश्री हेच राजकीय केंद्र असल्याने त्यांचा राजकीय प्रवास तसा बालपणापासूनच झाला. सिनेटपासून अनेक निवडणुकीचा त्यांनी अगोदर अनुभव घेतला. 2009 मध्ये पहिल्यांदा वरळी मतदारसंघातून त्यांना आमदारकी लढवण्याची संधी मिळाली. तेव्हापासून ते राजकारणात सक्रिय आहेत. त्यानंतर महाविकास आघाडीत त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपदाची लॉटरी लागली होती.
  • आदित्य यांना त्यावेळी शिवसेनेने कॅबिनेट मंत्रीपद दिले होते. त्यावर शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते भरत गोगावले यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यावेळी आदित्य यांना मंत्री पद द्यायला नको होते. पक्षातील लोकांना संधी दिली पाहिजे होती. महाविकास आघाडीची सत्ता असताना मुख्यमंत्रीपद हे एकनाथ शिंदे यांना दिला पाहिजे होते, असे मत गोगावले यांनी व्यक्त केले.
  • उद्धव ठाकरे हे आपल्या पत्नीचे खूप ऐकतात. रश्मी ठाकरे यांचे नाव न घेता गोगावले यांनी फुटीमागील अनेक कारणांपैकी रश्मी ठाकरे पण एक कारण असल्याचे म्हटले आहे. महिलांचा कुठपर्यंत हस्तक्षेप घ्यायला पाहिजे विचार करायला पाहिजे. पडद्याच्या पाठिमागून वहिनींचा हस्तक्षेप बराचसा होता. उध्दवसाहेबांच्या मनात अनेक गोष्टी असाच्या मात्र नंतर बदल व्हायचा, असा आरोप गोगावले यांनी केला आहे.

Related Articles

Back to top button