लॉरेन्स बिश्नोईच्या प्रेमाचा भयानक अंत
सध्या देशभरात लॉरेन्स बिश्नोई या नावाची चर्चा आहे. माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमुळे गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई चर्चेत आला आहे. पोलीस हवालदाराचा मुलगा असणाऱ्या लॉरेन्सने गुन्हेगारीलाच त्याचे जग कसे बनवले? लॉरेन्स गुन्हेगारी विश्वात कसा आला?, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. पण यामागचे कारण लॉरेन्सची गर्लफ्रेंड आहे.
लॉरेन्सच्या लव स्टोरीचा भयानक अंत त्याच्या गुन्हेगारी विश्वात येण्याचे कारण बनले. लॉरेन्स त्याच्या गर्लफ्रेंडमुळे गँगस्टर बनला. कॉलेजमध्ये घडलेल्या एका घटनेने लॉरेन्सचे आयुष्य बदलून गेले.
ही गोष्टी आहे 2008 सालची. जेव्हा लॉरेन्स एक सर्वसामान्य आयुष्य जगत होता. शाळेत असताना लॉरेन्स एका मुलीच्या प्रेमात पडला. तेव्हा लॉरेन्सच्या दिसण्यावर अनेक मुली भाळल्या होत्या. मात्र लॉरेन्स एका मुलीच्या प्रेमात आकंठ बुडाला होता. पुढे त्या मुलीचाही लॉरेन्सवर जीव जडला. तिचेही त्याच्यावर भरपूर प्रेम होते.
शाळेतले प्रेम कॉलेजमध्ये पोहोचले. दोघेही चंदीगडच्या डीएव्ही कॉलेजमध्ये शिकत होते. या दरम्यान लॉरेन्सच्या आयुष्यात एक वादळ आले. ते म्हणजे कॉलेजची निवडणूक. लॉरेन्सने कॉलेजमध्ये त्याचा ग्रुप तयार केला. लॉरेन्स कॉलेजमध्ये हळूहळू प्रसिद्ध होत गेला. मात्र लॉरेन्सची ही प्रसिद्धी लॉरेन्सच्या दुसऱ्या ग्रुपला पचली नाही. या दरम्यान कॉलेजमध्ये निवडणुका झाल्या. या निवडणुकीत लॉरेन्स देखील उभा राहिला होता. पण यात दुसरा गट विजयी झाला. यानंतर दोन्ही गटांमधील खुन्नस वाढत गेली.
दुसऱ्या ग्रुपने लॉरेन्सला टार्गेट बनवले. दुसऱ्या गटाने लॉरेन्सला उद्ध्वस्त करायचे ठरवले. अशात लॉरेन्सचा जीव असलेल्या त्याच्या गर्लफ्रेंडचा मृत्यू झाल्याची बातमी आली.
लॉरेन्सच्या गर्लफ्रेंडला जिवंत जाळले गेल्याची माहिती आहे. यानंतर बदल्याच्या भावनेने लॉरेन्सने विद्यार्थी संघटनेच्या नेत्यांवर गोळीबार केला. इथूनच लॉरेन्सने गुन्हेगारी विश्वात पाऊल ठेवले.