गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा

नृत्यांगणा गौतमी पाटीलचा कार्यक्रम म्हटला तर गर्दी आलीच. गौतमीच्या कार्यक्रमाला लहानापासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण गर्दी करतात. गौतमीचा डान्स आणि तिची एक झलक पाहण्यासाठी प्रचंड गर्दी होत असते. सध्या गौतमीचे राज्यभर कार्यक्रम होत असतात. या कार्यक्रमात राडा होत असल्याच्या अनेक बातम्या समोर येत असतात. दरम्यान लातूरमध्ये गौतमीच्या कार्यक्रमात तरुणांनी हुल्लडबाडी करत राडा केला. यावेळी गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. त्यानंतर पोलिसांनी गौतमीचा कार्यक्रम बंद पाडला. तिच्या कार्यक्रमाचे व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, लातूरच्या उदगीरमध्ये गौतमीच्या डान्सच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गौतमीचा डान्सचा कार्यक्रम म्हणून लातूरकरांनी या कार्यक्रमाला मोठी गर्दी होती. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनी हजेरी लावली. या कार्यक्रमाला फक्त नागरिकच नाही तर कॅबिनेटमंत्री संजय बनसोडे, माजी आमदार सुधाकर भालेराव आणि भाजप जिल्हाध्यक्षांनी हजेरी लावली होती.
या कार्यक्रमात खूपच मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे मागे बसलेल्या प्रेक्षकांना गौतमी व्यवस्थित दिसत नव्हती. परिणामी कोणीतरी पाठीमागून दगड फेकून मारला. दगड लागल्यामुळे एक तरूण जखमी झाला. काही तरुणांनी कार्यक्रमावेळी हुल्लडबाजी केली. यावेळी काही तरूणांनी गौतमीचा डान्स व्यवस्थित पाहता यावा, यासाठी नेत्यांचे बॅनर फाडून टॉवरवर चढले. आयोजकांनी यावेळी या तरुणांना खाली उरतण्यास सांगितले, पण त्यांनी काही ऐकले नाही. या कार्यक्रमात काही तरुणांनी राडा देखील केला. यावेळी पोलिसांनी गर्दी पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला.