सोलापूर महापालिका ओरबडून खाणाऱ्यांना हिशोब विचारण्याचा अधिकार नाही
माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी उजनी येथून पाईपलाईन आणून पन्नास वर्षे सोलापूर वर अधिराज्य गाजवलं. आमदार देशमुख यांनी पालकमंत्री असताना उजनी वरून दुसरी पाईपलाईन आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.सत्ता मिळाल्यानंतर शहरातील नागरिकांसाठी पिण्याची पाण्याची सोय व्हावी यासाठी सात वर्षात हजारो कोटींचा निधी यासाठी आणला. दरवर्षी बाराशे कोटी रुपयांचा निधी ३५ वर्ष ज्यांनी वापरला ज्यांनी महापालिका ओरबाडून खाल्ली असा सवाल कोठे यांचे नाव न घेता राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी व्यापारी मेळाव्यात उपस्थित केला..
भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी माहितीचे अधिकृत उमेदवार विजयकुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ सम्राट चौकातील महेश गार्डन येथे भव्य व्यापारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी व्यासपीठावर राम वल्लभ जाजू, कैलास कोठारी, अभय सुराणा, इंदरमल जैन,पुरुषोत्तम धुत, ब्रिजमोहन फोफ्लिया,निलेश भंडारी, केतन शहा, गुंडू शर्मा, दीपक मुनोत, आनंद शर्मा,चेतन पाटील,जयचंद्र वेद, सुहास कदम, अशोक चव्हाण, अमर पुदाले,जुमलजी करावा, श्रीनिवास दायमा, रोहिणी तडवळकर आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलताना चंदनशिवे म्हणाले की शहर उत्तर मध्ये भाजपच्या विचारधारा असलेल्या व्यक्तींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. आमदार देशमुख हे विक्रमी मतांनी निवडून येतील. महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या मंत्रिमंडळाच्या शपथविधी मध्ये मालक शपथ घेतील हे आम्हाला पाहायचा आहे. शहरातील व्यापाऱ्यांना हवे तेव्हा पाहिजे ती मदत मालकांनी वेळोवेळी केली आहे. वेळप्रसंगी कामात हाय काय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यास ही सांगितले. मागील पंधरा वर्षापासून मी महानगरपालिकेच्या सभागृहात साक्षीदार आहे. देशमुख मालकांनी भाजपची सत्ता आल्यावर पालिकेच्या पदाधिकाऱ्यांना बोलावून सांगितले जनतेसाठी काम करा, कोणतेही चुकीच्या कामांना पाठीशी घालू नका. पैशाच्या मोहात पडू नका चांगले काम करा नाव कमवा. मी तुम्हाला पैसे देतो. स्टॅंडिंग सभागृह महापौर पदाच्या कार्यकाळात कोणतेही आर्थिक विषयाच्या मागे लागू नका असा सांगणारा आमदार मी जवळून पाहिला आहे. टक्केवारी न घेणारा आमदार म्हणून उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे.मागील २० वर्षात २५ हजार पेक्षा रुग्णांवर हृदयाचे ऑपरेशन कॅन्सरच्या उपचारासाठी आणि डोळ्यांचे ऑपरेशन मालकांनी गोरगरीब जनतेसाठी मोफत घडवून आणले. आमदार देशमुखांनी कधी कामाची प्रसिद्धी केली नाही त्यांना ते आवडतही नाही. हाथी चलता है,कुत्ते भोगते है, या उक्तीप्रमाणे मालकांनी प्रसिद्धीच्या मागे लागून स्वतःचं कौतुक करून घेतल नाही. मालकांना जा विचारणाऱ्यांनी तुम्ही कधी कुठल्या गरीबाचा दवाखान्याचा खर्च केलात का ? कुठल्या गरिबाला ऑपरेशन साठी मदत केलीत का ? उजनी वरून येणारी दुहेरी पाईपलाईनचे काम ९०% झाला असून थोड्या दिवसातच काम पूर्ण होऊन शहराचे पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे. याचाही गवगवा कधी आमदार देशमुखांनी केला नाही. ज्यांच्या हातात महापालिकेची सत्ता ३५ वर्ष होती, दरवर्षी बाराशे कोटी रुपयांचा निधी ज्यांच्या हातात होता, ज्यांनी महापालिका ओरबडून खाल्ली त्यांनी स्वतः काय केलं याचा आधी हिशोब द्यावा, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी केली…