राजकीय
ब्रेकिंग! अजितदादा महायुतीतून बाहेर पडले तर?
- सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. अशातच विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये देखील आरोपाचे राजकारण रंगले आहे. महायुतीचा प्रमुख घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मात्र बटेंगे तो कटेंगे हे वक्तव्य बरोबर नसल्याचे म्हटले आहे. यावरून आता शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
- एक है तो सेफ है या विधानाला आता अजितदादा विरोध करत आहेत, मात्र याला काहीही अर्थ नाही. परंतु आता अजित पवारांनी त्या आघाडीतून बाहेर पडले तर त्याला अर्थ आहे, कारण त्यांच्या सोबत रहायचे आणि त्यांच्या एका विधानाला विरोध करायचा, हे मात्र ठीक नसल्याचे पाटील म्हणाले. पाटील यांनी अहमदपूर मतदारसंघातील उमेदवार विनायकराव पाटील यांच्यासाठी लातूर जिल्ह्यातल्या चाकुर येथे सभा घेतली. त्यावेळी पाटील यांनी अजित पवारांवर हल्लाबोल केला आहे