राजकीय

शरद पवारांनी मुख्यमंत्रीपदाचे पत्ते खोलले! म्हणाले…

  • राज्यात विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यापासून महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? ही चर्चा सुरू झाली होती. उद्धव ठाकरेंनी निवडणुकीला सामोरे जाण्याआधी मुख्यमंत्रीपदाची चेहरा जाहीर करावा, अशी मागणी केली होती. मात्र शरद पवारांची राष्ट्रवादी व काँग्रेसने ठाकरेंची भूमिका मान्य न करता निकालानंतर यावर निर्णय घेण्याचे जाहीर केले. महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असणार हे अद्याप गुलदस्त्यात असताना जेष्ठ नेते शरद पवार यांनी एक वक्तव्य केले आहे.
  • पवार म्हणाले की, विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आम्ही सर्व घटक पक्ष एकत्र बसू. ज्यांचे आमदार जास्त त्या पक्षाला मुख्यमंत्रिपदासाठी आम्ही पाठिंबा देऊ, अशी माझ्या पक्षाची भूमिका आहे. 
  • विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाबरोबरच मुख्यमंत्रीपदाच्या घोषणेसाठीही महाविकास आघाडीत संघर्ष झाला होता. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस राज्यात नंबर वन पक्ष ठरल्यानंतर राज्यातील काँग्रेस नेत्यांचा आत्मविश्वास वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्यांनी ज्यांचे आमदार जास्त त्यांचा मुख्यमंत्री अशी भूमिका घेतल्याची चर्चा होती. मात्र ठाकरेंना हे सूत्र मान्य नव्हते. 
  • त्यांचे म्हणणे होते, मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आधीच जाहीर करावा व मग निवडणुकीचा सामना करावा. भाजपसोबतच्या युतीचा अनुभव सांगत त्यांनी म्हटले होते की, असे केल्यास मित्रपक्षांमध्ये आपले आमदार जास्त निवडून आणण्यासाठी सहकारी पक्षाचे आमदार पाडण्याची स्पर्धा लागू शकते. यामुळे महाआघाडीला फटका बसू शकतो.

Related Articles

Back to top button