सोलापूर

सोलापूर! भवानी पेठेत मोठा राडा

  • सोलापूर (प्रतिनिधी) किरकोळ कारणावरून दमदाटी करत रिक्षाची काच फोडल्याप्रकरणी एका जणाविरुद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या दरम्यान दत्त मंदिर येथे घडली. याप्रकरणी सिद्धाराम फकिरप्पा करली (वय-३१,रा. भवानी पेठ) यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून डी के उर्फ बंडगर (पूर्ण नाव माहित नाही, रा.मड्डी वस्ती) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
  • याबाबत अधिक माहिती अशी की, रिक्षा क्रमांक एमएच.१३.बीव्ही.०३२३ ही शंकर हुलके यांच्या मालकीची असून, फिर्यादी हा ती रिक्षा भाडेतत्त्वावर चालवतो. दरम्यान वरील ठिकाणी रिक्षातून फ्लाऊडचा माल उतरत असताना वरील संशयित आरोपी हा दुचाकीवर येऊन फिर्यादी यांना तू रिक्षाचे भाडे का मारतो असे म्हणून दमदाटी करून दगडाने डोक्यात मारले. त्यावेळी फिर्यादी यांच्या मानेला व बरगळीला मार लागला असून, रिक्षाच्या काचेवर दगड मारून नुकसान केले आहे.
  • तसेच स्वतः ब्लेडने हातावर मारून घेऊन पळून गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस हवालदार दुधाळे हे करीत आहेत.

Related Articles

Back to top button