क्राईम

नागपूर हिंसाचाराचा मास्टरमाईंड, पोलिसांनी फहीम खानची कुंडलीच काढली

  • नागपूर हिंसाचाराचा मास्टरमाईंडचे नाव समोर आले आहे. गणेशपेठ पोलिस ठाण्यात दंगलखोरांविरुद्ध दाखल केलेल्या एफआयआरमध्ये त्याच्या नावाचा उल्लेख आहे.
  • मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी (एमडीपी) चा शहराध्यक्ष फहीम शमीम खान याच्या नेतृत्वाखाली ५० ते ६० लोकांनी बेकायदेशीरपणे पोलिस स्टेशनमध्ये गर्दी जमवली. यानंतर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या लोकांनी गांधी गेटजवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर निदर्शने केली.
  • हा फहीम कोण आहे, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. 
  • फहीम हा 38 वर्षांचा असून, त्याने दहावीपर्यंत शिक्षण घेतले आहे. हिंसाचाराला प्रवृत्त करण्यासाठी त्याने लोकांना भडकवले आणि पोलीस हिंदू समाजाचे आहेत, ते आपली मदत करणार नाहीत, असे सांगत आंदोलनकर्त्यांना उत्तेजित केल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत फहीमने निवडणूक लढवली होती, मात्र त्याला पराभव पत्करावा लागला होता.

Related Articles

Back to top button