राजकीय

नॉटरिचेबल आमदार वनगा रेंजमध्ये आले, पण पुन्हा…

उमेदवारी न मिळाल्यामुळे दुखावलेले शिंदे गटाचे पालघर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा हे सोमवारी संध्याकाळपासून बेपत्ता होते. अखेर 36 तास उलटल्यानंतर त्यांनी कुटुंबीयांना फोन करुन आपण सुखरुप असल्याचे सांगितले. त्यानंतर वनगा हे पालघरमधील आपल्या घरीही आले होते. घरी आल्यानंतर त्यांनी कुटुंबीयांशी काहीवेळ बातचीत केली. त्यानंतर वनगा हे कुटुंबीयांना सांगून पुन्हा घराबाहेर पडले.

वनगा यांचे दोन्ही मोबाईल फोन सोमवारी संध्याकाळपासून नॉट रिचेबल लागत होते. वनगा यांच्या मनात आत्महत्येचे विचार घोळत असल्याचे त्यांच्या पत्नीने सांगितलं होते. त्यामुळे वनगा यांचे कुटुंबीय चिंतेत होते. अखेर मंगळवारी रात्री उशीरा वनगा कोणालाही पत्ता लागून न देता घरी आले. प्राथमिक माहितीनुसार, वनगा हे रात्री दोन ते तीनच्या दरम्यान घरी आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांची ही संपर्क साधल्याचे समजते. ते रात्री त्यांच्या मित्रांसोबत गेले आहेत, असे त्यांच्या पत्नीने सांगितले असून ते व्यवस्थित असल्याचेही सांगितले आहे.

सोमवारी संध्याकाळपासून ते आपल्या एका मित्राच्या घरी होते. ते सध्या प्रचंड डिप्रेशनमध्ये आहेत. शांत झाल्यावर ते घरी आले. आमच्याशी बोलून ते पुन्हा घराबाहेर पडले, अशी माहिती वनगा यांच्या पत्नीने दिली. मात्र, वनगा पुन्हा कुठे गेले, याबद्दल त्यांच्या कुटुंबीयांकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

Related Articles

Back to top button