खेळ

ब्रेकिंग! पाकिस्तान संघामध्ये भूकंप

भारतात चालू असलेल्या क्रिकेट वर्ल्ड कपच्या सामन्यात पाकिस्तान संघाची कामगिरी खूप खराब झाली आहे. परिणामी धक्क्यात असलेल्या पाक क्रिकेट बोर्डाला आता परत एक झटका बसला आहे. माजी कर्णधार इंझमाम-उल-हकने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या मुख्य निवडकर्ता पदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान इंझमामने आपला राजीनामा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख झका अश्रफ यांना पाठवला आहे.

यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत सलग चार पराभव पत्कारल्यानंतर पाकिस्तानचे वर्ल्ड कपमधून जवळ-जवळ पॅकअप झाले आहे. नेदरलँड्स आणि श्रीलंकेविरुद्ध विजय मिळवून त्यांच्या मोहिमेची सुरुवात केली. परंतु, टीम इंडियाविरुद्ध झालेल्या सामन्यात मिळालेल्या पराभवानंतर त्यांची पडझड सुरू झाली.
कर्णधार बाबर आझमच्या नेतृत्त्वात खेळत असलेल्या पाकिस्तान संघाची वर्ल्ड कपमध्ये कामगिरी खूप खराब झाली आहे. या कामगिरीमुळे आझम आणि संघ व्यवस्थापनावर टीकेची झोड उठवली जात आहे. संघाची खराब कामगिरी पाहता बाबरचे कर्णधार पद धोक्यात आले आहे. या वर्ल्डकपमध्ये पाक संघाचा सहा पैकी चार सामन्यात पराभव झाला आहे. केवळ दोन सामन्यात बाबर पाकिस्तानने विजय मिळवला असून चार पाईंट्ससह पाकचा संघ गुणतालिकेत सहाव्या स्थानी आहे.
दरम्यान माजी पाकिस्तानी कर्णधार इंझमामची ऑगस्ट महिन्यातच मुख्य निवडकर्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. हारून रशीदच्या जागी त्यांना हे पद मिळाले, पण इंझमाम हे पद तीन महिनेही सांभाळू शकले नाहीत. वर्ल्डकपमधील पाकिस्तान संघाची खराब कामगिरी पाहता त्यांनी पीसीबीच्या मुख्य निवडकर्ता पदाचा राजीनामा दिला आहे.

Related Articles

Back to top button