राजकीय
ब्रेकिंग! भाजपची तिसरी यादी जाहीर
- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने आज आपली तिसरी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये भाजपाने 25 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पीए सुमित वानखेडे यांनादेखील भाजपाने आर्वी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे.
- भाजपाने आमदार सुरेश धस यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे. त्यामुळे आष्टी विधानसभा मतदारसंघात सुरेश धस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) मेहेबूब शेख यांच्यात लढत पाहायला मिळणार आहे.
- तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विरोधात भाजपाने साकोली मतदारसंघात अविनाश ब्राह्मणकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर भारती लवेकर यांना वर्सोवा मतदारसंघातून पुन्हा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
- भाजपाची तिसरी यादी
- मुर्तिजापूर : हरीश पिंपळे
- कारंजा : सई डहाके
- तिवसा : राजेश वानखडे
- मोर्शी : उमेश यावलकर
- आर्वी : सुमित वानखेडे
- काटोल : चरणसिंह ठाकूर
- सावनेर : आशिष देशमुख
- नागपूर मध्य : प्रवीण दटके
- नागपूर पश्चिम : सुधाकर कोहळे
- नागपूर उत्तर : मिलिंद माने
- साकोली : अविनाश ब्राम्हणकर
- चंद्रपूर : किशोर जोरगेवार
- आर्णी : राजू तोडसाम
- उमरखेड : किशन वाखेडे
- देगलुर : जितेश अंतापूरकर
- डहाणू : विनोद मेढा
- वसई : स्नेहा डुबे
- बोरिवली : संजय उपाध्याय
- वर्सोवा : भारती लव्हेकर
- घाटकोपर : पराग शाह
- आष्टी : सुरेश धस
- लातूर : अर्चना चाकुरकर
- माळशिरस : राम सातपुते
- कराड उत्तर : मनोज घोरपडे
- पळुस कडेगाव : संग्राम देशमुख.