सोलापूर
दुपारी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून…

सोलापूर (प्रतिनिधी) गुरुवारी दुपारी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून डोक्यात लोखंडी रॉड मारून तरुणीच्या गळा दाबून अर्धा तोळ्याचे मिनी मंगळसूत्र भांडणात कुठेतरी पडून गहाळ झाल्याची फिर्याद शितल शहा बनसोडे (वय-२५,रा.समाचार चौक) यांनी जेलरोड पोलीस ठाण्यात दिली आहे.
ही घटना १६ जानेवारी रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास समाचार चौक येथे घडली.शितल बनसोडे यांच्या फिर्यादीवरून परमेश्वर गुंडू बनसोडे,श्रीशैल गुंडू बनसोडे,मल्लिनाथ गुंडू बनसोडे, संभाजी जनार्दन बनसोडे,शिवाजी जनार्दन बनसोडे, अर्जुन दर्याप्पा हाटकर दर्याप्पा हटकर गुंडू धोंडीबा बनसोडे राहणार सोलापूर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे या घटनेचा पुढील तपास पोसई जाधव हे करीत आहेत.