क्राईम
आधी प्रेम, मग शोषण, अश्लील फोटोही काढले

- लव्ह, सेक्स आणि धोका असाच काहीसा धक्कादायक प्रकार राज्यात समोर आला आहे. एका अल्पवयीन तरूणीला शेजारीच राहाणाऱ्या तरुणाने प्रेमाच्या जाळ्यात ओढले. विशेष म्हणजे तेथ दोघेही अल्पवयीन आहेत. प्रेमाच्या जाळ्यात ओढल्यानंतर या तरुणाने मुलीबरोबर शरीरसंबध प्रस्थापित केले. यावेळचे फोटो आणि व्हिडीओही त्याने काढून ठेवले होते. त्या माध्यमातून तो त्या मुलीला सतत ब्लॅकमेल करत होता. त्यात तिचे शोषण तो करत होता. यातूनच या तरुणाने त्या तरूणीचे अश्लील फोटो इन्स्टावर व्हायरल केले. त्यानंतर या तरुणीच्या पायाखालची वाळूच सरकली.
- तू दुसऱ्यांबरोबर का बोलते, माझ्याबरोबर संबंध का ठेवत नाहीत, शरीरसुख का देत नाही, असे म्हणून तो तिचा सतत छळ करत होता. शिवाय तिला मारहाणही करत होता. एक दिवस तो तिला एका निवांत ठिकाणी घेवून गेला. तिथे त्याचे मित्रही होते. त्यावेळी त्याने त्या अल्पवयीन तरूणीला मारहाणही केली. त्याचा व्हिडीओही त्याच्या मित्रांनी तयार केला. तो व्हिडीओ व्हायरल झाला. तो नेहमी तिला आपल्याशी संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती करत होता. नाही तर ते फोटो व्हायरल करेन, अशी धमकी देत होता.
- शेवटी त्याने नको ते केलेच. तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. याची माहिती त्या तरूणीला मिळाली. तिने तातडीने माहिती आपल्या आईला सांगितली. आईने त्याच वेळी एका सामाजिक कार्यकर्त्याची मदत घेतली. झालेला प्रकार आईने त्या सामाजिक कार्यकर्त्याच्या कानावर घातला. त्याने तातडीने त्यांची मदत केली. पीडीत मुलीला घेवून ते अकोला शहरातील खदान पोलिस ठाण्यात गेले. त्यांनी झालेली हकीकगत पोलिसांना सांगितली. पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनीही तातडीने गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.



