खेळ

भाड़ में गई बिर्याणी, रवी शास्त्रींनी डिवचताच शमी संतापला

  • मोहम्मद शमीने त्याच्या स्फोटक स्पेलच्या जोरावर टीम इंडियाला अनेक संस्मरणीय विजय मिळवून दिलं आहे. दरम्यान टीम इंडियाचे माजी हेड कोच रवी शास्त्री यांनी शमीबाबतचा एक किस्सा सांगितला आहे.
  • शमीला डिवचल्यानंतर त्याचा राग मैदानातील कामगिरीत दिसतो, असे शास्त्रींनी सांगितले. शास्त्री यांनी शमीला डिवचले होते. त्यानंतर शमीने एक जबरदस्त स्पेल टाकला आणि टीम इंडियाला दक्षिण आफ्रिका विरुद्ध टेस्ट मॅचमध्ये विजय मिळाला, असे शास्त्रींनी सांगितले. शास्त्री, शमी आणि बिर्याणी यांचा तो किस्सा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
  • टीम इंडियाने 2018 साली दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला होता. त्या दौऱ्यातील तिसऱ्या टेस्टमध्ये ही घटना घडली. आफ्रिकेने पहिल्या दोन टेस्ट जिंकून सीरिज जिंकली होती. तिसरी टेस्ट जिंकण्यासाठी शेवटच्या दिवशी लंचनंतर आफ्रिकेला शंभरपेक्षा कमी रन्सची गरज होती. आफ्रिकेच्या सात विकेट्स शिल्लक होत्या.
  • शास्त्री यांनी लंच टाईममध्ये शमी एका मोठ्या प्लेटमध्ये बिर्याणी खात पाहिलं. त्यांनी शमीला त्यावर चिडवायला सुरुवात केली. शास्त्रींनी सांगितले, ती मॅच चांगलीच टफ होती. दुपारच्या जेवणाच्या वेळी मी जात असताना, मी शमीची प्लेट पाहिली. त्याच्या प्लेटमध्ये ढिगभर बिर्याणी होती. 
  • टीम इंडियाचे तत्कालीन बॉलिंग कोच भरत अरुण यांनी सांगितले की, शास्त्रींनी शमीला चिडवत विचारले, तेरा भूक इधर ठीक हो गया क्या? (तुझी भूक इथेच भागली की काय?).
  • शमीने शास्त्रींना रागाने उत्तर दिले आणि बिर्याणी खाण्यास नकार दिला. शास्त्रींनी सांगितल्यानुसार, शमीने उत्तर दिले, ले ले प्लेट. नही चाहिए बिर्याणी (प्लेट घे. नकोय बिर्याणी). बिर्याणी नरकात जाऊ दे. यानंतर शास्त्री अरुणकडे गेले आणि त्यांना शमीला चिडलेला राहू दे, असे सांगितले.
  • शास्त्रींनी अरुणला सूचना दिली, तो रागावला आहे. त्याला तसेच राहू द्या. जर त्याला तुमच्याशी बोलायचे असेल, तर त्याला सांगा की काही विकेट्स घेऊन मग बोलावे.
  • दरम्यान शमीने त्यानंतर सर्व राग मैदानातील बॉलिंगमध्ये काढला. त्याने पुढील सत्रात आफ्रिकेच्या मिडल आणि लोअर ऑर्डरला खिंडार पाडले. त्याने 28 रन्समध्ये 5 विकेट्स घेतल्या. टीम इंडियाने ती टेस्ट 63 रन्सने जिंकली. या विजयात शमीची भूमिका महत्त्वाची होती.

Related Articles

Back to top button