हिदायत सामाजिक संस्थेच्या कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या थाटात

सोलापूर : सोलापुरातील मोमीन नगर, मुळेगाव रोड येथे हिदायत बहुउध्देशिय सामाजिक संस्थेच्या कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या थाटात संपन्न झाले असुन, या संस्थेचे उद्घाटक माजी महापौर तथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते महेश कोठे यांच्या हस्ते रिबन कापुन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव उपस्थित होते. आलेल्या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती वारीश कुडले, साबीर कुर्ले, जावेद शिकलकर, अबुजर शेख मौलाना, उस्मान शेख, लक्ष्मण भोसले, संजय कुराडे, अनिस शेख, अजमेर शेख, मोईन नदाफ, नागराज चिमणे, ईमाम मुल्ला, दस्तगीर सय्यद, नवाज बळगानुर, जहीर मकानदार, सोहेल सय्यद जे.पी. पटेल तसेच या भागातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. आलेल्या मान्यवरांनी आपापले मनोगत व्यक्त केले व पुढीलवाटचालीस शुभेच्छा दिल्या. ही संस्था २०२० पासुन चालु असुन कुठलाही गाजावाजा न करता कोरोना काळात गोरगरिब व त्याचबरोबर सतत लढा देणारी बहुउध्देशिय संस्था म्हणुन नावाजलेली आहे परंतु आज २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औच्छित्य साधुन या संस्थेला आपलं स्वत:च आपल्या हक्काचे व्यासपीठ एक कचेरीची आवश्यकता पडली म्हणुनच या संस्थेचे मोठ्या थाटात उद्घाटन झाले. संस्थेच्यावतीने विविध गोरगरिब व गरजु लोकांना मदत करत आलेली आहे आणि यापुढेही विविध दिनदुबळ्या, विधवा, रुग्णांसाठी तसेच विद्यार्थ्यांना मदत करत राहिन असे या संस्थेचे अध्यक्ष लाडजी नदाफ यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रियाज अत्तार यांनी केले तर आभार प्रदर्शन जावेद शिकलकर यांनी केले.