राजकीय
ब्रेकिंग! ठाकरे गटाला तगडा झटका

- राज्यात पुढील महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या दृष्टिकोनातून सर्वच राजकीय पक्षांकडून तयारी केली जात आहे. यंदाची विधानसभा निवडणूक अटीतटीची होईल, असा अंदाज आहे. दरम्यान, महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांनी आपल्या उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या. अद्याप महाविकास आघाडीचे जागावाटप पूर्ण झाले नाही. ठाकरे गट आणि कॉग्रेसमध्ये जागावाटपावरून रस्सीखेच सुरू आहे. अशातच ठाकरे गटाला तगडा झटका बसला आहे. संभाजी ब्रिगेड आणि ठाकरे गटाची युती तुटल्याची माहिती समोर आली आहे.
- महाविकास आघाडीतील छोट्या पक्षांना जागावाटपात विचारात घेतले जात नसल्यामुळे छोटे घटक पक्ष नाराज आहेत. आता संभाजी ब्रिगेडनेही नाराजी व्यक्त केली आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत संभाजी ब्रिगेडने महाविकास आघाडीला पूर्ण पाठिंबा दिला होता. यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तुम्हाला विधानसभेच्या पाच ते सहा जागा देऊ, असे सांगितले. मात्र या जागेची चर्चा झाली नाही. आम्हाला जागा वाटपात सहभागी केले नाही. त्यामुळेच आम्ही ही युती तोडत असल्याचे आखरेंनी स्पष्ट केले आहे.
- महाविकास आघाडीसोबत गेल्यानंतर बहुजनवादी चळवळींना बळ मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, ही अपेक्षा धुळीस मिळाली. हे पक्ष पुरोगामी चळवळीला थारा देत नाहीत, अशी टीका करत महायुतीची सनातनी विषमता आणि महाविकास आघाडीचे नकली पुरोगामीत्व यांच्या विरुध्द बहुजन समाजीतल सर्व पुरोगामी चळवळींना एकत्र येऊ लढले पाहिजे, असे आवाहनही आखरेंनी केले आहे.