क्राईम
कविताला मिळाली प्रेमाची शिक्षा

- एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका बापानेच लेकीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत पोलिसांनी वडिलांना अटक केली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.
- कर्नाटकच्या कलबुर्गी कविता शंकर कोल्लूर असे मृत तरुणीचे नाव आहे तर शंकर कोल्लूर असे तिच्या वडिलांचे नाव आहे. कविता कुरुबा समाजातील एक रिक्षा चालक मलप्पाच्या सोबत प्रेमात होती. याला तिच्या घरच्यांचा विरोध होता. मात्र, ती घरच्यांचे ऐकत नव्हती. तिला त्याच्याशीच लग्न करायचे होते. 27 ऑगस्टच्या रात्री तिच्यात आणि कुटुंबात याच मुद्द्यावरुन वाद झाला. यावेळी वडील शंकर कोल्लूर, त्यांचा भाचा शरणु आणि नातेवाईक दत्तप्पा चोलाबारद यांनी तिचा गळा आवळून तिची हत्या केली आणि आत्महत्येचा बनाव रचत तिच्या तोंडात कीटनाशक औषध टाकले. दुसऱ्या दिवशी सकाळी आरोपींनी पुरावा मिटविण्यासाठी कविताचा मृतदेह चिक्का रोडजवळील शंकराच्या भावाच्या शेतात जाऊन जाळला.
- पोलिसांना एका तरुणीच्या मृत्यूची माहिती मिळताच त्यांनी या घटनेची चौकशी केली असता गावकऱ्यांनी सुरुवातीला सांगितले की, मुलीने विषारी औषध घेतले होते, ज्यात तिचा मृत्यू झाला. मात्र, पोलिसांना संशय आल्याने याचा तपास सुरू केला. तेव्हा त्यांना घटनास्थळावरुन अंशिक स्वरुपात जळालेले अवशेष सापडले आणि कटकारस्थान उघडं पडले. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून वडील शंकर कोल्लूर यांना अटक केली आहे. तर इतर दोघांची चौकशी केली जात आहे.



