सोलापूर ब्रेकिंग! विधानसभा निवडणूक काळात जिल्हाधिकारी यांचे निर्बंध जाहीर
भारत निवडणूक आयोगाने दिनांक 15ऑक्टोबर 2024 रोजी अन्वये विधानसभा सार्वत्रिक निवडणूक- 2024 चा कार्यक्रम घोषित झाल्याच्या दिनांकापासून आदर्श आचार संहिता अंमलात आली आहे. सोलापूर जिल्हयामध्ये विधानसभा निवडणूक 2024 ची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोणातून भारतीय नागरीक सुरक्षा संहिता-2023 चे कलम 163 अन्वये आणि मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33 (एन) मधील तरतुदीनुसार जिल्हादंडाधिकारी, सोलापूर कुमार आशीर्वाद (भा.प्र.से.), यांच्या अधिकारान्वये खालील प्रमाणे निबंध घालण्यात येत आहेत.
विधानसभा निवडणूक प्रचार मोहीमेच्या कालावधीत सर्व राजकीय पक्षाचे उमेदवार, निवडणूक लढविणारे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते आणि हितचिंतक हे वाहनांवर ध्वनीक्षेपक बसवून मोठ्या आवाजातून प्रचार केल्यास ध्वनी प्रदुषण होणे, सर्वसामान्य लोकांच्या जीवनातील शांततेस व स्वास्थास बाधा पोहोचण्याची व उशीरा रात्री पर्यंत ध्वनीक्षेपण यंत्रणा चालु ठेवण्यावर निर्बंध घालण्यात येत आहेत.
कोणतीही व्यक्ती, संस्था पक्ष कार्यकर्ते यांनी ध्वनीक्षेपकाचा (लाऊडस्पिकरचा) वापर पोलीस अधिकाऱ्याचे परवानगी शिवाय करता येणार नाही.
सकाळी 6 वाजण्यापुर्वी आणि रात्री 10 वाजेनंतर कोणत्याही फिरत्या वाहनावर व कोणत्याही क्षेत्रात. ध्वनीक्षेपकाचा वापर करता येणार नाही.
प्रचाराकरीता ध्वनी क्षेपकाचा वापर विशिष्ट ठिकाणी थांबुनच करावा, फिरणाऱ्या वाहनास रस्त्यावरुन धावत असतांना ध्वनिक्षेपकाचा वापर करण्यास प्रतिबंध असेल,
सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवार व इतर व्यक्तींनी निश्चीत ठिकाणी ध्वनी क्षेपकाच्या वापरासंबंधीच्या परवानगीची माहीती जिल्हादंडाधिकारी, संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी व संबंधीत यंत्रणेस कळविणे बंधनकारक राहील.
तसेच राजकिय पक्षांनी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी ,मुद्रणालयाच्या मालकांने व इतरमाध्यमाव्दारे छापाई करणाऱ्या मालकांनी मतपत्रिका छापताना खालील बाबींवर निर्बंध असतील.
इतर उमेदवरांचे नाव व त्यांनी नेमुन देण्यात आलेले चिन्ह वापरणे नमुना मतपत्रिकेसाठी आयोगाने निश्चित केल्याप्रमाणे कागद वापरणे.आयोगाने निश्चित केलेल्या कागदाच्या आकारामध्ये नमुना मतपत्रिका छापणे. इ.
सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरणास प्रतिबंध करण्याबाबत विधान सभा निवडणूकीच्या कालावधी मध्ये नगरपालिका नगरपंचायत व ग्रामिणभागात शासकीय निमशासकीय सार्वजनिक मालमत्तेची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरूपात सक्षम प्राधिकाऱ्याचे पूर्वपरवानगी शिवाय होर्डीग्ज ,बॅनर्स, पोस्टर्स व भिंतीवर जाहिरात प्रदर्शित करण्यास निवडणूक होईपर्यंत 25 नोव्हेंबर 2024 निर्बंध घालण्यात आले आहेत.