बिजनेस

तो मराठा कसला जो छावा बघून रडला नाही

  • सोलापूरसह अन्य भागात ‘छावा’ चित्रपटाला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाचे सर्व शो फुल्ल आहेत. संभाजी महाराज इतिहास रुपेरी पडद्यावर पाहून नवीन पिढीचा ऊर देखील अभिमानाने भरून येत आहे. असाच एका लहानग्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. आपल्या शंभूराजाची अनन्वित छळ करुन हालाहाल करून औरंगजेबाने हत्या केली. सिनेमातील हे दृश्य पाहून प्रेक्षकांना भावना अनावर होत आहेत.
  • एका लहान मुलासोबतही असेच झाले. मुलगा पालकांसोबत छावा चित्रपट पाहायला गेला होता. चित्रपटाचा शेवट पाहून या मुलाला अश्रू अनावर झाले. महाराजांचा इतिहास पाहून त्याच्या भावना अनावर झाल्या. डोळ्यातून पाणी वाहत असताना त्याने छत्रपती संभाजी महाराजांबद्दल गौरवोद्गार काढले. यावेळी त्याच्या पालकांनी त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला.
  • या लहानग्याचा व्हिडीओ विकी कौशलने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर देखील शेअर केला आहे. विकी कौशलने म्हटले की, हीच आमची सर्वात मोठी कमाई आहे. बेटा मला तुझा अभिमान आहे. तुला मिठी मारता आली असती तर बरं होईल. तुमच्या प्रेमाबद्दल आणि भावनांबद्दल सर्वांचे आभार. आम्हाला शंभूराजेंची कहाणी जगातील प्रत्येक घरात पोहोचवायची होती आणि हे घडताना पाहणे हा आमचा सर्वात मोठा विजय आहे.

Related Articles

Back to top button