राजकीय
ब्रेकिंग! अदिती तटकरेंचा पॅटर्नच वेगळा

- विधानसभेमध्ये आजपर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरे यांनी तब्बल 82 हजार 854 मतांची दणदणीत आघाडी घेत मोठा विजय मिळवला आहे. श्रीवर्धन मतदारसंघातून अदिती यांना एक लाख 15 हजार 226 मते मिळाली. तर त्यांच्या विरोधातील महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अनिल नवगणे यांना 33 हजार 33 मते मिळाली. विशेष म्हणजे 2019 च्या निवडणुकीत तटकरे यांना 92 हजारांहून अधिक मते मिळाली होती आणि तेव्हा 39 हजार 800 मतांच्या आघाडीने त्या विजयी झाल्या होत्या.
- अदिती विजयी झाल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांची त्यांची आणि अनिकेत तटकरे यांनी मिरवणूक काढली तसेच विजयाचा जल्लोष केला. या निवडणुकीत महाविकास आघाडीत फूट पडली होती. काँग्रेसचे राजेंद्र ऊर्फ राजाभाऊ ठाकूर यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला होता. त्यानंतर पक्षाने त्यांची हकालपट्टी केली. मात्र, राजेंद्र ठाकूर यांना अवघी 4 हजार 70 मते मिळाली तर मनसेचे फैसल पोपेरे यांना 2 हजार 108 मते मिळाली आहेत.



