महाराष्ट्र

पेपर सुरू होताच प्रश्नपत्रिका केंद्राच्या बाहेर

  1. दहावीच्या परिक्षेला आजपासून सुरूवात झाली आहे. अशातच पेपरफुटीची घटना समोर आली आहे. जालना जिल्ह्यातील बदनापूर येथे दहावीच्या मराठी पेपर फुटला आहे. पेपर सुरू झाल्यानंतर अवघ्या पंधरा मिनिटातच प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्राच्या बाहेर आल्याने शहरातील झेरॉक्स सेंटरमधून उत्तरपत्रिकांच्या प्रिंट काढून विद्यार्थ्यांना पुरवल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार बदनापूरमध्ये समोर आला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.
  2. मिळालेल्या माहितीनुसार, संपूर्ण राज्यामध्ये आजपासून दहावीच्या बोर्डाची परीक्षा सुरू झाली आहे. आज मराठीचा पहिला पेपर होता. सकाळी ११ वाजता परीक्षेला सुरुवात झाल्यानंतर अवघ्या पंधरा ते वीस मिनिटांमध्ये जालना जिल्ह्यातील बदनापूर येथे दहावीच्या मराठीची प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्राच्या बाहेर आली. या घटनेनंतर बदनापूर येथील झेरॉक्स सेंटरवर थेट उत्तरपत्रिकांच्या झेरॉक्स मारून विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्याचा प्रकार समोर आला आहे. 

Related Articles

Back to top button