बिग ब्रेकिंग! न्यायदेवतेच्या डोळ्यावरील काळीपट्टी हटवली, हातात तलवार नव्हे तर आता…

Admin
1 Min Read

सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी आज आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार सर्वोच्च न्यायालयातील न्यायदेवतेच्या डोळ्यांवरील पट्टी हटवण्यात आली आहे तसेच न्यायदेवतेच्या हातातून तलवार देखील काढण्यात आली आहे. त्यामुळे आता न्यायदेवतेच्या एका हातात तलवारीच्या जागी संविधान दिसणार आहे. माहितीनुसार, न्यायाधीशांच्या लायब्ररीमध्ये हा नवीन स्वरूपाचा पुतळा बसवण्यात आला आहे. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या पुढाकाराने हा पुतळा बसवण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.

न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांच्या मते, भारताने ब्रिटिश वारशातून पुढे जावे आणि कायदा कधीही आंधळा नसतो, तो सर्वांना समानतेने पाहतो. त्यामुळे लेडी जस्टिसचे स्वरूप बदलायला हवे, असे सरन्यायाधीश म्हणाले. पुतळ्याच्या एका हातात तलवार नसून संविधान असावे, असे ते म्हणाले.

 

Share This Article