राजकीय

दया कुछ तो गडबड है

राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागू शकते. यामुळे महायुती सरकारने विविध निर्णयांचा सपाटा लावला आहे. गुरुवारी सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकांमध्ये अनेक निर्णय घेण्यात आले . तब्बल ४० निर्णय घेण्यात आले. मात्र, या मंत्रिमंडळाच्या बैठकीतून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे दहा मिनिटांतच बाहेर पडल्याने महायुतीत वादाची ठिणगी पडली असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही बैठक तब्बल अडीच तास अजितदादा यांच्या अनुपस्थितीत सुरू होती व तब्बल ३८ निर्णय यावेळी मंजूर करण्यात आले. दरम्यान, या घटनेवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सरकारवर निशाणा साधला असून अजितदादा यांना सत्तेतून बाहेर काढण्यासाठी भाजप, शिवसेनेचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंत्रिमंडळ बैठकीत शेवटच्या क्षणी काही प्रस्ताव आणल्यामुळे अजितदादा नाराज असल्याची चर्चा आहे. गेल्या आठवड्यांमध्ये अर्थ विभागाकडून सरकारच्या प्रस्तावांना विरोध केला जात आहे. तसेच भाजपच्या काही आमदारांना भूखंड वाटप करण्यासही अजितदादा यांनी विरोध दर्शविला होता. त्यामुळे काही मुद्यांवरून महायुतीमध्ये सर्वकाही ठीक नाही, अशी चर्चा आहे.
दरम्यान बैठकीतून बाहेर का पडले याचे स्पष्टीकरण अजितदादा यांनी दिले आहे. त्यांनी नाराजीच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. पूर्व नियोजित कार्यक्रम असल्यामुळे बैठकीतून बाहेर पडलो, असे अजितदादा यांनी म्हटले आहे. याबाबत मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांना माहिती दिल्याचे त्यांनी सांगितले.

Related Articles

Back to top button