क्राईम

रस्ता क्रॉस करत असताना तरुणीला भरधाव डंपरने उडवले

राज्यात अपघाताचे सत्र थांबण्याचे नाव काय घेईना. अशातच आता पुण्यातील कोथरुड स्टॅन्डसमोर तरुणीला डंपरने उडवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे.
शहरातील कोथरुड स्टॅन्डसमोरुन तरुणी रस्ता क्रॉस करत होती. तेव्हा डंपरने तरुणीला धडक देऊन जोरात उडवले. त्यावेळी तरुणीच्या डोक्यावरुन मिक्सरचे चाक गेल्याने तरुणीचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.
आरती सुरेश मनवाने (वय 23 रा. एरंडे होस्टेल भेलके नगर कोथरूड) ही कोकण एक्सप्रेस हॉटेल येथून कर्वे रोडने डिव्हायडर वरून रोड क्रॉस करत होती. रस्ता ओलांडताना तिला डंपरची जोरदार धडक बसली. यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. 

Related Articles

Back to top button