देश - विदेश

ब्रेकिंग! ऐन सणासुदीत गरिबांना मोठी खुशखबर

दसऱ्याच्या तोंडावर मोदी सरकारने देशातील करोडो गरिबांना मोठे गिफ्ट दिले असून डिसेंबर 2028 पर्यंत प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत मोफत धान्य देण्यास मंजुरी दिली आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. आजच्या कॅबिनेट बैठकीत अनेक योजनांनादेखील ग्रीन सिग्नल देण्यात आला आहे. मंत्रिमंडळाने जुलै 2024 ते डिसेंबर 2028 पर्यंत प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना आणि इतर कल्याणकारी योजनांतर्गत मोफत तांदळाचा पुरवठा सुरू ठेवण्यास मंजुरी दिली आहे. यासर्वासाठी लागणारा 17,082 कोटी रुपये खर्च केंद्र सरकार करणार आहे. विकासाला चालना देणे आणि पोषण सुरक्षा वाढवणे हा सरकारच्या या उपक्रमाचा उद्देश असल्याचेही वैष्णव यांनी सांगितले.
एप्रिल 2022 मध्ये आर्थिक घडामोडींच्या कॅबिनेट समितीने मार्च 2024 पर्यंत देशभरात टप्प्याटप्प्याने तांदूळ तटबंदी उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला होता. आतापर्यंत तीन टप्प्यांत त्याची यशस्वी अंमलबजावणी झाली आहे. ते म्हणाले की, गरिबांना मोफत तांदूळ पुरवठा केल्यास अशक्तपणा आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता कमी होईल.

Related Articles

Back to top button