क्राईम

प्रेम, ब्लॅकमेल अन् मर्डर!

  • अश्लील फोटो काढून एका तरुणीला सतत ब्लॅकमेल करणे एका बिल्डरच्या मुलाला चांगलेच भोवले आहे. २० वर्षीय पीडित तरुणीला बिल्डरचा मुलगा सतत ब्लॅकमेल करत होता. 
  • त्यामुळे तिच्या मित्राने त्या मुलाची कोयत्याने वार करत हत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. 
  • हत्या झालेला तरुण हा एका बिल्डरचा मुलगा असून त्याचे नाव स्वयम शैलेश परांजपे असे आहे. या गुन्ह्यात आरोपीला प्रेयसीनेच मदत केल्याचे समोर आले. पोलिसांनी या प्रकरणी तरुणीसह तिच्या नव्या प्रियकराला अटक केली आहे.
  • मिळालेल्या माहितीनुसार, स्वयम हा त्याच्या एक्स गर्लफ्रेंडला ब्लॅकमेल करत होता. तिचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करेन अशी धमकी देत होता. 
  • यामुळे त्रासलेल्या त्याच्या प्रेयसीने तिच्या प्रियकरासह मिळून स्वयमचे घर गाठले. दोघांनी त्याच्यावर कोयत्याने आणि कटरने वार केले. जवळपास ५० वार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मयुरेश नंदू धुमाळ असे आरोपी प्रियकराचे नाव आहे.
  • स्वयमवर वार केल्यानंतर तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. हत्येनंतर तरुणी आणि तिचा प्रियकर इमारतीच्या खाली आले. तिथे ते १० मिनिट शांतपणे बसले होते. त्यांनी सिगारटचे झुरके घेत पोलीस येण्याची वाट पाहिली. 
  • तर आरोपीचे वडील हे पोलीस सेवेत असल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस घटनास्थळी आल्यानंतर दोन्ही आरोपी स्वत: पोलिसांसमोर शरण गेले.

Related Articles

Back to top button