बिजनेस

खुशखबर! ग्राहकांसाठी सुवर्णसंधी

दसऱ्यानिमित्त नवीन बाईक खरेदी करण्याचा विचार करत असलेल्या ग्राहकांसाठी सुवर्णसंधी आहे. दरम्यान सणासुदीच्या काळात आपली विक्री वाढवण्यासाठी टीव्हीएस मोटरने आपल्या कम्युटर बाईक रेडियॉनचे सर्वात स्वस्त बेस व्हेरिएंट लॉन्च केले आहे.

टीव्हीएस रेडियॉन ११० ऑल-ब्लॅक कलर ऑप्शनसह लॉन्च करण्यात आला. या प्रकाराची कमी किंमत हा त्याचा प्लस पॉईंट आहे. ही बाईक बाजारात उपलब्ध असलेल्या हिरो स्प्लेंडरशी स्पर्धा करेल.
या बाईकच्या बेस एडिशनची (दिल्ली) एक्स- शोरूमची किंमत ५९ हजार ८८० रुपये आहे. ड्रम व्हेरिएंटची किंमत ७७ हजार ३९४ आहे. तर, डीजी डिस्कची एक्स- शोरूमची किंमत ८१ हजार ३९४ रुपये आहे.
टीव्हीएस रेडियॉन मध्ये १०९.७ सीसी एअर-कूल्ड, सिंगल-सिलेंडर इंजिन आहे, जे ८.१९ पीएस पॉवर आणि ८.७ एनएम टॉर्क देते. हे इंजिन ४ स्पीड गिअरबॉक्सने सुसज्ज आहे. बाईकचे इंजिन स्मूथ आहे आणि ते शहरात रायडिंगसाठी अतिशय उत्तम आहे. ब्रेकिंगसाठी बाइकमध्ये ड्रम आणि डिस्क ब्रेकची सुविधा आहे. बाईकच्या सर्व प्रकारांमध्ये १८-इंच अलॉय व्हील आहेत. बाईकमध्ये रंगीत एलसीडी स्क्रीन आणि यूएसबी चार्जिंग पोर्टचा समावेश आहे.

Related Articles

Back to top button