सोलापूर

सोलापूर! दहिटणे सर्व्हिस रोडवर अपघात

सोलापूर (प्रतिनिधी) दहिटणे सर्व्हिस रोड येथील वक्रतुंड हेअर सलूनच्या दुकानासमोर दुचाकी वाहन क्रं. एमएच.१३. बीएच.०३५१ ही दुचाकी महादेव अंबादास जतकर (वय-६१,रा. दहिटणे) यांनी अतिवेगाने चालवून फिर्यादी फरीस युनससो रेड्डी (वय-२७, रा.विडी घरकुल) यांचे वडील युनससो रेड्डी (वय-५६) यांना जोराची धडक देऊन गंभीर दुखापत केली. तसेच स्वतः जखमी होऊन दुचाकीवरील मागे बसलेला नवनाथ गव्हाणे याला देखील जखमी करण्यास कारणीभूत ठरला आहे. अशा आशयाची फिर्याद फरिस रेड्डी याने जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात दिली आहे. त्याच्या फिर्यादीवरून महादेव जतकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.ही  घटना ३ ऑक्टोंबर रोजी रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेचा पुढील तपास पोसई.येडे हे करीत आहेत.

Related Articles

Back to top button