सोलापूर
ब्रेकिंग! सोलापुरात भयंकर प्रताप

सोलापूर (प्रतिनिधी) तीस टन तांदूळ भरून मालट्रक पाठवण्याचा बहाणा करून १० लाख ८० हजाराला फसवल्याप्रकरणी दोघाजणाविरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना दि.३१ जुलै २०२४ ते २ ऑगस्ट २०२४ दरम्यान ॲक्सिस बँक कन्ना चौक येथे घडली. याप्रकरणी अन्सार आरिफ शेख (वय-३०,रा. जोडभावी पेठ) यांनी जेलरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून अरबाज आरिफ दनाणी व साजिद रहीम परियाणी (रा. गरीब नवाज कॉलनी, ईलाही नगर, शहादा, नंदुरबार) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
या घटनेची हकीकत अशी की, वरील संशयित आरोपी हे सुपर ट्रेनिंग कंपनी प्रो.प्रायटरचे मालक यांच्याकडे तीस टन तांदूळ माल असल्याचे दलाल परेश बिडे यांनी फिर्यादीस सांगून साजिद याचा मोबाईल नंबर फिर्यादीस दिल्याने संपर्क साधून फिर्यादी यांच्या ओळखीचे अमीर मजिद शेख, बिलाल नाकेदार यांना तांदूळ मालाचे सॅम्पल पाठवण्याकरिता नाशिक येथे पाठवून दिले.
तेव्हा अरबाज व साजिद यांनी गायत्री ऍग्रो इंडस्ट्रीज घोटी नाशिक एगतपुरी राईस मिल येथे घेऊन जाऊन मालक रामदास येसू खाडगीर यांची ओळख करून देऊन तांदळाचे सॅम्पल दाखवले. त्यावेळी अरबाज व साजिद यांनी मालकाकडून तीस टन खरेदी केलेले माल नसताना त्यांनी तीस टन माल खरेदी केले आहे असा बनाव करून तीस टन तांदूळ हे मालट्रकमध्ये भरून पाठवण्याचा बहाणा केला व फिर्यादी यांच्या खात्यावरील १० लाख ८० हजार रुपये पैसे प्राप्त करून घेऊन तीस टन भरलेला मालट्रक पाठवून न देता फिर्यादी यांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक बिराजदार हे करीत आहेत.