राजकीय
ऐन निवडणुकीत कर्नाटकात काँग्रेसला दणका

देशात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरणात चांगलेच तापू लागले आहे. राजकीय पक्षांकडून प्रचार केला जात आहे. विविध ठिकाणी जाहीर सभा होत आहेत. देशात एकूण सात टप्प्यात मतदान होणार आहे. दरम्यान, काँग्रेसचे माजी आमदार अखंड श्रीनिवास मूर्ती यांनी काल कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. श्रीनिवास यांनी यापूर्वी पुलकेशीनगरचे आमदार म्हणून काम केले आहे.
केंद्रीयमंत्री आणि भाजप नेत्या शोभा करंदलाजे यांनी श्रीनिवास यांची भेट घेतली. यामुळे आमची ताकद वाढेल आणि भाजप कर्नाटक राज्यातील सर्व २८ जागा जिंकेल, असा विश्वास करंदलाजे यांनी व्यक्त केला आहे.