अजितदादांचा शरद पवारांवर खळबळजनक आरोप

देशात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरणात चांगलेच तापू लागले आहे. राजकीय पक्षांकडून प्रचार केला जात आहे. विविध ठिकाणी जाहीर सभा होत आहेत.
देशात एकूण सात टप्प्यात मतदान होणार आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना शरद पवारांनी मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर आता शरद पवारांच्या वक्तव्यावर अजितदादा चांगलेच संतापले. त्यांनी शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल केला.
घरातले पवार आणि बाहेरच पवार वेगळे, असे वक्तव्य केल्यानंतर शरद पवारांवर अजितदादा गटाने टीकेची झोड उठवली होती. त्यानंतर पवारांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आता अजितदादा यांनी शरद पवारांना लक्ष केले. इंदापुरातील एका सभेला संबोधित करताना अजितदादा यांनी शरद पवारांवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले, 40 वर्ष एखाद्याच्या घरी येऊन ती परकी मानली जाते, याचाही महिलांनी विचार केला पाहिजे. वरिष्ठ तुम्हाला परके मानत असतील, तर तळपायाची आग मस्तकात जाणार नाही का? असा सवाल अजितदादा यांनी केला.
अजितदादा यांनी शरद पवारांचे थेट नाव न घेता खळबळजनक आरोप केला आहे. कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमसोबत कोणाचे नाव जोडले गेले? भूखंडाचे श्रीखंड खाल्लं आरोप कोणावर आहे? असा सवाल विचारत अजितदादा यांनी शरद पवारांवर हल्लाबोल केला. या आरोपांमध्ये तथ्य नव्हते. मात्र आरोप झालेच ना. बदनामी झालीच ना, असे विधान अजितदादा यांनी केले.