सोलापूर
तुला लय मस्ती आलीय…

सोलापूर : पूर्वीच्या भाडेकरूने दुचाकीवरून कामाला जात असताना लाथ दाखविली. त्यासंदर्भात त्याच्याकडे विचारणा केली असता ‘तुला लय मस्ती आलीय’ म्हणून त्याने शिवीगाळ सुरू केली.
त्यानंतर रस्त्यावर पडलेला दगड उचलून डोक्यात मारून जखमी केले, अशी फिर्याद अमर उर्फ अनिल श्रीनिवास अरशणपल्ली (रा. साईबाबा चौक) यांनी जेलरोड पोलिसांत दिली. त्यावरून पुंडलिक बसवराज यंगाली याच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. बुधवारी दुपारी १२च्या सुमारास हे भांडण झाल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. तर अमर अशरणपल्ली याने मागील भांडणाच्या रागातून शिगवीाळ करून मारहाण केल्याची फिर्याद पुंडलिक यंगाली याने पोलिसांत दिली आहे. पोलिस हवालदार घुगे तपास करीत आहेत.