सोलापूर
हिंदू दहशतवादाच्या आरोपावर…

देशात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरणात चांगलेच तापू लागले आहे. राजकीय पक्षांकडून प्रचार केला जात आहे. विविध ठिकाणी जाहीर सभा होत आहेत. देशात एकूण सात टप्प्यात मतदान होणार आहे.दरम्यान, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे पुन्हा चर्चेत आले आहेत. कारण साधारण देशात भगव्या व हिंदू दहशतवादास राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपा उत्तेजन देत आहे, अशा शब्दांत त्यांनी टीका केली होती. आता सुमारे 20 वर्षांनंतर सुशीलकुमार यांना उपरती झाली आहे.हिंदू दहशतवादाबाबत मी 20 वर्षांपूर्वी बोललेलो होतो तेच ते घेऊन बसले आहेत. मी गृहमंत्रीपदाचे कर्तव्य करत होतो, त्यावेळी जे रेकॉर्डवर आले तेच मी सांगितले होते, असे ते म्हणाले.