सोलापूर

ब्रेकिंग! मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस, अजितदादा, अदिती तटकरे मंगळवारी सोलापुरात

सोलापूर:- मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियान अंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळा मंगळवार दिनांक 8 ऑक्टोबर रोजी होम मैदान येथे आयोजित करण्यात आलेला आहे. या सोहळ्यासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिला लाभार्थी उपस्थित राहावेत यासाठी साडेतीनशे पेक्षा अधिक बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तरी सर्व संबंधित महिला लाभार्थ्यांनी या सोहळयाला उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले की, या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री अजित पवार,  महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे, जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची राहणार आहे. दिनांक 8 ऑक्टोबर रोजी सोलापूर शहरातील होम मैदान येथे दुपारी 12:30 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिला लाभार्थ्यांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे. असे आवाहन त्यांनी केले.

आशीर्वाद यांनी होम मैदान येथे मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळ्याच्या तयारीची पाहणी केली. येथे 40 हजार महिला लाभार्थी बसू शकतील असा सभा मंडप तयार करण्यात येत आहे. तसेच विविध शासकीय योजनांची माहिती देणारे स्टॉल हे लावण्यात येणार आहेत. या कामाची प्रत्यक्ष पाहणी तसेच आवश्यक सूचना त्यांनी यावेळी संबंधित शासकीय यंत्रणा व गुत्तेदार यांना दिल्या. तसेच प्रत्येक तालुक्यातून येणाऱ्या बसेससाठी व अन्य वाहनासाठी पोलीस विभागाच्या वतीने शहरात ठीकठिकाणी तयार केलेल्या पार्किंगची माहितीही त्यांनी घेतली. 

Related Articles

Back to top button