सोलापूर

सोलापुरात दहशत माजविण्याचा प्रयत्न

सोलापूर : आंध्र नवरात्र महोत्सव तरुण मंडळातील महिला सदस्य अलकुंटे चौकात डान्स करताना त्याठिकाणी चौघांनी येऊन महिलासोबत डान्स करण्यास सुरुवात केली. त्यांना मंडळातील काही सदस्यांनी विरोध केला असता यातील चौघांनी आम्हाला डान्स करण्यापासून कोण रोखणार आहे. त्यास आम्ही जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिल्याची घटना 3 ऑक्टोबर रोजी रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली.
याप्रकरणी सिद्राम चंद्रप्पा म्हेत्रे (वय-४०,व्यवसाय व्यापार, रा.घर नंबर 37 प्रकाश बापूजी हाऊसिंग सोसायटी अलकुंटे चौक) यांनी सदर बझार पोलिस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून गणेश सिद्धाराम म्हेत्रे रा. सरस्वती चौक,मोची समाजाचे अध्यक्ष करेप्पा जंगम यांच्या घराशेजारी बापू उर्फ उमेश आवट, ओंकार मच्चा, राजेश अन्नोज यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
यात अधिक माहिती अशी की, घटस्थापनेच्या दिवशी
दिवशी आंध्र नवरात्र महोत्सव तरुण मंडळातील महिला सदस्य हे देवी मिरवणुकीत डान्स करीत होत्या.त्याठिकाणी गणेश सिद्धराम म्हेत्रे यांनी त्याच्या उजव्या हाताने तलवार उंचवून आम्हाला डान्स करण्यापासून कोण रोखणार त्यास आम्ही जिवंत सोडणार नाही असे म्हणून व इतरांनी काठ्या आणून माझ्यासह मंडळातील उपाध्यक्ष नरसिंग सिद्धाराम वल्लापोल्लू व इतर सदस्यांना शिविगाळ करून आमच्या अंगावर तलवारीने व काठ्यांनी मारण्यासाठी येऊन दहशत निर्माण केली आहे. त्या दहशतीमुळे आमच्या गल्लीतील महिला व मंडळाचे सदस्य तेथून पळून गेले असे फिर्यादीत नमूद आहे. या घटनेचा पुढील तपास सदर बझार पोलीस करीत आहेत.

Related Articles

Back to top button