राजकीय

राज्यात नवा ट्विस्ट!

राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा होणार आहे. यापूर्वी फलटणच्या राजकारणातून मोठी घडामोड समोर आली आहे. अजितदादा पवार गटातील रामराजे नाईक निंबाळकर मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. फलटण येथे त्यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला होता. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याचे संकेत दिले. यामुळे आता अजितदादा यांना ज्येष्ठ नेते शरद पवार आणखी एक धक्का देणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.
रामराजे यांनी फलटण येथे कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना पुढचा निर्णय काय घ्यायचा? असा सवाल केला. यावेळी कार्यकर्त्यांमधून ‘तुतारी’ साठी जल्लोष झाला. यावेळी बोलताना नाईक निंबाळकर यांनी रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यावर टीका केली. रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले, मला काल काही जणांचा फोन आला. त्यांनी विचारले, तुम्ही अजितदादांना सोडून तिकडे चालले आहे का? मला काय बोलायचे हेच सुचेना. ही चर्चाच झाली नाही, ही चर्चा राज्यभर पसरली.
कदाचित आपल्याच विरोकांनी ही बातमी दिली असेल. मी तिकडे गेलो तर आपल्याला विधानसभेत कमळावर उभे राहता येईल, असे त्यांना वाटत असेल, असा आरोपही नाईक निंबाळकर यांनी केला.

Related Articles

Back to top button