सोलापूर
ब्रेकिंग! सोलापूर आज भयंकर तापले

सध्या सोलापूर शहर व परिसरात उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे रस्त्यावर शुकशुकाट दिसून येत आहे. दरम्यान, राज्यात उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला असून होळीआधीच दुसरी उष्णतेची लाट आली आहे. बहुतांश ठिकाणी पारा ३६ अंश सेल्सियसच्या पुढे गेला आहे. दरम्यान सोलापुरात आज होळी दिवशी 40.8 अंश सेल्सियस तापमान नोंदविले गेले आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.