सोलापूर

ब्रेकिंग! सोलापूर ते मुंबई विमान सेवेसाठी…

येत्या काही दिवसात राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा होणार आहे. त्यामुळे आचारसंहिता लागू होण्यापूर्वी आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्य सरकारने अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहे. या बैठकीमध्ये राज्य सरकारने अनेक निर्णयांना मंजुरी देत दिलासा दिला आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील अकृषिक कर पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे तसेच मच्छिमार आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी देखील राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. या निर्णयानुसार आता गोड्या पाण्यातील मच्छिमारांसाठी तसेच सागरी मच्छिमारांसाठी महामंडळ स्थापन करण्यात येणार आहे. जाणून घ्या, राज्य मंत्रिमंडळातील निर्णय.
सोलापूर ते मुंबई हवाई मार्गासाठी व्हायबिलिटी गॅप फंडिंग देणार (विमानचालन विभाग), वैद्यकीय अधिकाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे व्यवसायरोध भत्ता देणार (सार्वजनिक आरोग्य विभाग), डेक्कन कॉलेज, गोखले संस्था, टिळक महाराष्ट्र मधील कर्मचाऱ्यांना सुधारित आश्वासित प्रगती योजना, संत भगवान बाबा ऊसतोड कामगार अपघात विमा योजना राबवणार, लहान जलविद्युत प्रकल्पासाठी बांधा वापरा हस्तांतरण धोरण, कोकण पुणे विभागासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या दोन कंपन्या, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना, राज्यात आरोग्य क्षेत्रात उत्कृष्टता केंद्र स्थापन करणे, जैन समाजासाठी अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ, बंजारा, लमाण तांड्यात ग्रामपंचायतसाठी लोकसंख्येची अट शिथिल.

Related Articles

Back to top button