सोलापूर

सोलापूर! रुपाभवानी मंदिरात स्तुत्य उपक्रम

सोलापूर, दि. 4- येथील श्री रुपाभवानी देऊळ ट्रस्ट सोलापूर, फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया शाखा सोलापूर जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण विभाग सोलापूर व जिज्ञासा महानगर सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्र महोत्सवानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.
रुपाभवानी मंदिरात झालेल्या या शिबिराचे उद्घाटन पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांच्या हस्ते करण्यात आले. 
याप्रसंगी ट्रस्टी, वहिवाटदार व पुजारी मल्लिनाथ मसरे, काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष प्रकाश वाले, फॅमिली प्लॅनिग ऑफ इंडियाचे मार्गदर्शक प्रा. डॉ. श्रीकांत येळेगावकर, शाखाधिकारी सुगतरत्न गायकवाड, मानकरी राजशेखर हिरेहब्बू, बाळासाहेब मुस्तारे, सुनील मसरे, अनिल मसरे, मनीष मसरे, सारंग मसरे, प्रतीक मसरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. पोलीस आयुक्त राजकुमार यांनी या उपक्रमाचे कौतुक करुन गरजू रुग्णांसाठी हे शिबिर लाभदायक ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
दरम्यान, नवरात्रोत्सवात सलग नऊ दिवस होणार्‍या या शिबिरात पहिल्या दिवशी ७०० इतक्या रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करुन त्यांना गरजेनुसार औषधे देण्यात आली. या शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजक मसरे यांनी केले.

Related Articles

Back to top button