क्राईम

डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट

सहा महिन्यांच्या बाळाला घेऊन एका महिलेने गोदावरी नदीत उडी मारत आपले जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही आई डॉक्टर असून तब्बल दोन तासांच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर केवळ आईचाच मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. सहा महिन्याच्या बाळाचा शोध सुरु आहे. दरम्यान, पैठणच्या पाटेगावच्या पुलावरून गोदावरी नदीपात्रात महिलेने सहा महिन्यांच्या बाळाला घेऊन उडी टाकली. डॉक्टर पूजा प्रभाकर व्हरकटे असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. 

आत्महत्या केलेल्या डॉक्टर महिलेला अंगावर दूध येत नव्हते. त्यामुळे ती बाळाला दूध देवू शकत नव्हती. त्यामुळे ती नैराश्यात गेली होती. त्यातूनच तिने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असे बोलले जात आहे. याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत.
डॉ. पूजा पैठणमध्ये राहात होत्या. त्यांनी प्रभाकर यांच्या बरोबर काही वर्षापूर्वी लग्न केले होते. पाच महिन्यांपूर्वी त्यांना एक बाळ झाले. बाळाचा जन्म झाल्यापासून डॉ. पूजा बाळाची काळजी घेत होत्या. मात्र त्यांना अंगावर दूध येत नव्हते. त्यामुळे त्यांना बाळाला दूध पाजता येत नव्हते. याचा त्रास त्यांना होत होता. त्याचा सतत विचार त्यांच्या डोक्यात येत होत्या. त्यात  गेल्या आठ दिवसांपासून त्या डिप्रेशनमध्ये गेल्या होत्या.
बाळाच्या काळजीपोटी अनेक विचार त्यांच्या मनात येत होते. त्यातून त्यांनी मागचा पुढचा कोणताही विचार न करता टोकाचे पाऊल उचलले. त्यांनी थेट आपल्या पाच महिन्याच्या चिमुकल्यासह आत्महत्याच केली. दूध येत नसल्यानेच हे पाऊल त्यांनी उचलल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.

Related Articles

Back to top button