सोलापूर

ब्रेकिंग! विधानसभेपूर्वीच मोठा धमाका

महाराष्ट्र विधानसभेची घोषणा नवरात्रीतच होण्याची शक्यता आहे. यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवारांनी अजितदादा पवारांच्या अनेक शिलेदारांना गळाला लावल्यानंतर भाजपाला धक्के देण्यास सुरूवात केली आहे. कागलमध्ये समरजितसिंह घाटगे यांनी भाजपा सोडल्यानंतर आता पश्चिम महाराष्ट्रातील आणखी एक भाजपाचा बडा नेता पवार गटात जाण्याची शक्यता आहे. इंदापूर मतदारसंघातील भाजपा नेते हर्षवर्धन पाटील लवकरच पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. हर्षवर्धन पाटील यांनी आज मुंबईत सिल्व्हर ओकवर जाऊन पवारांची भेट घेतली. जवळपास एक तास त्यांच्यात चर्चा झाली.
माजी आमदार हर्षवर्धन पाटील भाजपला रामराम ठोकणार हे, जवळपास निश्चित झाले आहे. घाटगे यांच्यानंतर पाटील यांच्या रुपात पश्चिम महाराष्ट्रात भाजपला दुसरा मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. याच्याआधी लोकसभा निवडणुकीच्या आधी सोलापूरमधून मोहिते -पाटील यांनी भाजपची साथ सोडली होती.
महायुतीत इंदापूरची जागा अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता आहे. यामुळे गेल्या पाच वर्षापासून या मतदारसंघात विधानसभेची तयारी करणाऱ्या पाटील यांनी दुसरा पर्याय शोधला आहे.

Related Articles

Back to top button