सोलापूर

ब्रेकिंग! सोलापुरात मुसळधार पाऊस

  • गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तथापि, हवामान विभागाने बुधवारी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा आणि काही ठिकाणी गारपिटीचाही इशारा दिला आहे.
  • भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नैऋत्य मोसमी पाऊस आज दक्षिण बंगालच्या उपसागरात, दक्षिण अंदमान समुद्रात, निकोबार बेटे आणि उत्तर अंदमान समुद्राच्या काही भागात दाखल झाला आहे. हे पावसाळ्याच्या अधिकृत सुरुवातीचे लक्षण असून यंदा मान्सूनचा वेग तुलनेत अधिक असल्याचेही हवामान विभागाचे निरीक्षण आहे. दरम्यान आज सायंकाळी सोलापुरात मुसळधार पाऊस झाला.

Related Articles

Back to top button