लग्नाची बोलणी झाली, दोघांनी शरीरसंबंध ठेवले!

राज्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लग्नाच्या बोलणीवेळी मैत्री झालेल्या एका तरुणाने तरुणीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मात्र नंतर त्यांची बोलणी फिस्कटल्याने तरुणीचे दुसऱ्या ठिकाणी लग्न ठरले.
हे समजताच संबंधित तरुणाने तिच्यासोबतच्या संबंधाचा व्हिडीओ त्या नवीन मुलाला दाखवून तिची बदनामी केली. परिणामी ठरलेले लग्न मोडले आणि पीडित तरुणीने पोलिसात धाव घेतली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील फिर्यादी तरुणी आणि आरोपी तरुणाची लग्नाची बोलणी सुरू असताना मैत्री झाली होती. एकत्र फिरायला गेल्यानंतर दोघांमध्ये सहमतीने शारीरिक संबंध झाले. मात्र त्यावेळी तरुणाने तिच्या संमतीशिवाय व्हिडीओ रेकॉर्डिंग केले. पुढे काही कारणास्तव दोघांची बोलणी फिस्कटली आणि तरुणीचे दुसऱ्या ठिकाणी लग्न ठरले.
हे समजताच आरोपी तरुणाने त्या ठिकाणी जाऊन नव्याने ठरलेल्या वरासोबत संपर्क साधला. या भेटीत त्याने तरुणीबरोबरच्या शारीरिक संबंधांचा व्हिडीओ दाखवला. होणाऱ्या पत्नीचा असा व्हिडीओ पाहून नवऱ्या मुलाला मोठा धक्का बसला आणि त्याने लग्न मोडण्याचा निर्णय घेतला.
या प्रकरणामुळे मानसिक धक्का बसलेल्या तरुणीने थेट सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तिच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संबंधित आरोपीवर विनयभंग, छेडछाड, खोटे आरोप लावून बदनामी करणे आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे



