मनोरंजन

ब्रेकिंग! अभिनेता गोविंदाला लागली गोळी

बॉलिवूड अभिनेता गोविंदाच्या पायाला आज सकाळी गोळी लागली. या घटनेत गोविंदा जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्या पायाला गोळी लागली आहे. ही घटना आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. यानंतर गोविंदला तातडीने CRITI केयर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. गोविंदा सकाळच्या वेळी बाहेर जाण्यासाठी निघाला असतानाच चुकून बंदुकीतून मिसफायर झाला.


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोळी सुटल्यानंतर काही पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यानंतर त्यांनी गोविंदाकडील बंदूक ताब्यात घेतली. तसेच या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. गोळी लागल्यानंतर गोविंदाच्या पायातून मोठा रक्तस्त्राव झाला आहे.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर गोविंदा सध्या अभिनयापासून दूर आहे. अनेक वर्षांपासून तो एकाही चित्रपटात दिसला नाही. त्याचे म्युझिक व्हिडिओ मात्र अधूनमधून येत असतात. याबरोबरच गोविंदा काही रियलिटी शोमध्ये दिसला आहे. 

Related Articles

Back to top button