बिजनेस

ब्रेकिंग! गॅस सिलेंडरचे दर वाढले

एलपीजी गॅस सिलेंडरचे नवे दर आज जाहीर करण्यात आले आहेत. दसरा, दिवाळी या सणांच्या आधीच ग्राहकांना महागाईचा फटका बसला आहे. व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत सुमारे ५० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. दरम्यान घरगुती  सिलेंडरच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. 

इंडियन ऑइलने जारी केलेल्या नवीनतम दरांनुसार, आजपासून मुंबईत व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत १६९२.५० रुपये, कोलकात्यात १८५०.५० रुपये आणि चेन्नईमध्ये १९०३ रुपये असेल. यापूर्वी सप्टेंबरमध्येही एलपीजी सिलेंडरचे दर सुमारे ३९ रुपयांनी वाढून १६९१.५० रुपयांवर पोहोचले होते. हे दर पूर्वी १६५२.५० रुपये होते. कोलकातामध्ये १९ किलोचा व्यावसायिक एलपीजी सिलेंडर आता ४८ रुपयांनी महागला आहे.

Related Articles

Back to top button